ग्रामपंचायत तिसगाव मध्ये स्वागत आहे
तिसगाव ता.देवळा जि.नाशिक
gptisgaon123@gmail.com
सुचना :
तुम्ही वरील बटन वर क्लिक करून AI ची मदत घेऊ शकतात
तिसगाव हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ३०३६ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ३, अंगणवाडी केंद्रे ५ माध्यमिक विद्यालय १ वाचनालय १ ,ग्रीन जिम व व्यायामशाळा १ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच खंडेराव महाराज मंदिर व पावजी दादा मंदिर हे प्रसिद्ध देवस्थान आहे. सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून अधिकतर कांदा, डाळींब, गहू व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. कांदा व डाळिंब या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
तिसगाव ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत शेकडो घरांना लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तिसगाव गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF+) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ९ सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
तिसगाव गाव आज देवळा तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.
तिसगाव गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून कांदा, डाळिंब, मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व लघुउद्योग यामध्येही कार्यरत आहेत.
गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे. गावात असलेले खंडेराव मंदिर येथे दर वर्षी चंपाषष्टी निमित्त खूप मोठी यात्रा भरवली जाते. गावातीलच नाही तर पंचक्रोशीतील लोक या यात्रेत सहभागी होतात.
येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. विशेषता महिलांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
तिसगावच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.
ग्रामदैवताचे मंदिर – गावातील खंडेराव महाराज व पावजी दादा देवतेचे मंदिर हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी साप्ताह व यात्रे सारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
हनुमान मंदिर व राममंदिर – गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मंदिर उत्सव व सणासुदीला ग्रामस्थांच्या भेटीगाठींचे केंद्र असते.
शेती क्षेत्र – तिसगाव हे कांदा व डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील हिरवीगार शेती व डाळींबच्या बागा पाहण्याजोगी आहे.
जलसंधारण प्रकल्प – पाणलोट क्षेत्राचा विकास व जलसंधारणाची चांगली सोय यामुळे परिसरात नैसर्गिक सौंदर्य खुलून दिसते.
श्रीमती.अर्चना हेमंत सोनार
श्री.दिपक एकनाथ आहेर
श्रीमती.सुलक्षणा राजेंद्र जाधव
श्री. उमाकांत अहिरे (सदस्य)
श्री अरविंद आहेर (सदस्य)
श्री.प्रवीण आहेर (सदस्य)
श्री.दशरथ गायकवाड (सदस्य)
श्रीमती.भीमाबाई ठाकरे (सदस्य)
श्रीमती.अर्चना आहेर (सदस्य)
श्रीमती.स्वप्नाली देवरे (सदस्य)
श्रीमती.पुष्पा पवार (सदस्य)
श्रीमती.चंद्रभागा पवार (सदस्य)
श्री. शरद आहेर
श्री. सचिन पवार
श्री. नारायण वाघ
श्री. भाऊसाहेब आहेर
1.श्रीमाती. जे.सी. कोडापे (ग्राम महसूल अधिकारी)
2.श्री. राजेंद्र देवरे (महसूल सेवक)
3.श्री. भाऊसाहेब आहेर व श्री. राजेंद्र देवरे (BLO)
4.श्री. उत्तम आहेर (पोलीस पाटील)
5.श्रीमती. भदाणे रेखा (सहाय्यक कृषी अधिकारी)
🌾 ग्रामपंचायत क्षेत्रफळ
1304.50 हेक्टर
🏢 वार्ड संख्या
४
👥 पुरुष संख्या
१६०८
👥 स्त्री संख्या
१४२८
👥 कुटुंब संख्या
६३९
👥 एकूण लोकसंख्या
३०३६